• Home
  • MMS Antakshari 2021 : Inviting Entries

MMS Antakshari 2021 : Inviting Entries

  • Fri, April 02, 2021
  • 4:00 PM - 5:30 PM
  • Online
  • 0

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नवनिर्वाचित कार्यकारिणी २०२१ आपले सहर्ष स्वागत करत आहे.

गाण्याच्या भेंड्या हा खेळ म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंद, उत्साह आणि हास्याचा ठेवा. तुमच्या भावंडांसोबत, मित्रांसोबत तुम्ही अशा कित्येक मैफिली रंगवल्या असतील, चला अशीच एक आनंदाची मैफिल आपण रंगवू या रंपंमीच्या निमित्ताने.

म. मं. सिं. घेऊन येत आहे ऑनलाईन मराठी भेंड्यांचा अर्थात अंताक्षरीचा कार्यक्रम, खास तुमच्यासाठी.

तारीख: २ एप्रिल २०२१
वेळ: दुपारी ४ वाजता
स्थळ: ZOOM

या खेळाचे नियम असे आहेत -

  • भेंड्या मराठी गाण्यांच्या (सुगम संगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत इत्यादी) असतील.
  • स्पर्धा झूमवर होईल आणि त्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्हद्वारे केले जाईल.
  • नावनोंदणी ३ स्पर्धकांच्या ७ गटांसाठी खुली आहे.
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धकांचे स्वतःचे महाराष्ट्र मंडळाचे विद्यमान सभासद असणे गरजेचे आहे.
  • गटप्रमुखाने आपली व इतर सदस्यांची नावनोंदणी म. मं. सिं. वेबसाईटवर एकत्र करावी.
  • नावनोंदणीची अंतिम तारीख २८ मार्च २०२१ आहे.
  • मंडळाचा आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल याची कृपया नोंद घ्यावी.
  • अधिक माहितीसाठी मानसी मराठे (+65 8208 4985) किंवा जुईली वाळिंबे (+65 8291 7859) ह्यांना संपर्क करावा. अथवा feedback@mmsingapore.org ला ई-मेल करावी.

मराठी अंताक्षरीच्या या कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल याची आम्हाला खात्री आहे.

सुरेश भटांनी म्हटले आहे “रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा“. त्याच धर्तीवर “रंगांची गाणी, गाण्यांचे रंग आणि खूप सारी मज्जा” हा आमचा वायदा!

सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software