• Home
  • Inviting entries for जे जे उत्तम - आत्मचरित्रातील नातेसंबंध - म.मं.सिं. गणेशोत्सव २०२१

Inviting entries for जे जे उत्तम - आत्मचरित्रातील नातेसंबंध - म.मं.सिं. गणेशोत्सव २०२१

  • Fri, September 10, 2021
  • 8:00 PM
  • Online - Zoom - FB Live
  • 4

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी!

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर दरवर्षी गणेशोत्सवात अनेक उपक्रम राबवत असते. त्या पैकी “जे जे उत्तम” हा अतिशय यशस्वी असा उपक्रम मंडळ गेली अनेक वर्षे सातत्याने चालवत आहे. या उपक्रमात उत्तमोत्तम साहित्याचे वाचन होते. त्यातून एकाचवेळी प्रबोधन व मनोरंजन या दोन्ही चा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येतो. या वर्षीही शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८:०० वा. आपण हा कार्यक्रम सादर करणार आहोत. अर्थात सद्य परिस्थितीतील नियमांचे पालन करूनच, हा कार्यक्रम ऑनलाईन असणार आहे. फेसबुक वर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येईल. 

“जे जे उत्तम” हा कार्यक्रम २०२१ च्या गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. या वर्षीची आपली संकल्पना नातेसंबंधांवर आधारित आहेत त्यामुळे जे जे उत्तम चा विषय आहे आत्मचरित्रातील नातेसंबंध”. आत्मचरित्र म्हटले की आयुष्याचा एक आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. यात त्या व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित अनेक घटना असतात, अनेक रंजक कथा असतात, संघर्ष असतो, आनंदाचे, दुःखाचे प्रसंग असतात. तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यातील काही अत्यंत महत्वाच्या नात्यांवर भाष्य असते. या नात्यामधले प्रेम, दुरावा, वाद, मैत्र, वात्सल्य, वाचकाला त्या व्यक्तीच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवते.

आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्मचरित्रातील नातेसंबंधावरील उताऱ्याचे वाचन करायचे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या काही घटना, काही लक्षात राहणारे प्रसंग, नातेसंबंधांचे त्यांच्या आयुष्यावर होणारे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम, नात्यातील नर्मविनोदी प्रसंग, तसेच काही अव्यक्त नात्यांचे वर्णन, या वर आधारित उतारा आपल्याला वाचायचा आहे. हा उतारा रंजक असावा याची वाचकांनी कृपया काळजी घ्यावी. यात सर्व प्रकारची नाती विचारात घेता येतील, ठराविक आई, वडील, मुलं, भावंडं ही नाती असतीलच शिवाय मित्र, प्रियकर/प्रेयसी, शिक्षक, विद्यार्थी, प्रभावी व्यक्तिमत्व(लेखकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी), अध्यात्मिक, अगदी एकतर्फी नात्याचा विचार केला गेला तरी चालेल. 


सूचना:

  • वाचनाची लांबी साधारण ५-८ मिनिटं इतकी असावी.

  • ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे जरुरी आहे.
  • वाचकांनी आपली नावनोंदणी  सप्टेंबर २०२१ पर्यंत करावी.

  • नाव नोंदणी नंतर, आपण जे साहित्य वाचणार आहेत ते आणि त्या पुस्तकाचे नाव आम्हाला sahitya@mmsingapore.org वर पाठवावे. 

  • आत्मचरित्रातील आपण वाचन असलेला उतारा स्वीकारण्याचे सर्वाधिकार मंडळाकडे असतील. कुठल्याही आक्षेपार्ह भाषेचे तसेच विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारे वाचन स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. 


या संदर्भात अधिक माहिती साठी जुईली वाळिंबे @ 82917859 यांच्याशी संपर्क साधू शकता. 


मंडळी, आपल्या भरभरून प्रतिसादाची अपेक्षा आहे,  शेवटी मंडळाचे आणि सभासदांचे एक खास नाते आहेच! 


सस्नेह
- म. मं. सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software