• Home
 • MMS Modak Workshop - गणेशोत्सव २०२१

MMS Modak Workshop - गणेशोत्सव २०२१

 • 27 Aug 2021
 • 14:00
 • 04 Sep 2021
 • 19:00
 • Various

Registration

 • Date : 31 August 2021, Tuesday
  Start Time: 2 pm
 • Date : 28 August 2021, Saturday
  Start Time : 2 pm
 • Date: 29th August 2021, Sunday
  Start Time: 10 am
 • Date: 1 September 2021, Wednesday
  Start Time : 3 pm
 • Date : 1 September 2021, Wednesday
  Start Time : 3 pm
 • Date: 30 August 2021,Monday
  Start Time: 2 pm
 • Date: 31 August 2021, Tuesday
  Start Time: 2 pm


नमस्कार मंडळी ,

गणेशोत्सव म्हटले की आठवते आरास, रांगोळी, वाटली डाळ आणि नैवेद्यासाठी मोदक मग ते पेढ्याचे असो, तळलेले असो वा उकडीचे !

आपण सगळेच बाप्पांची आतुरतेने वाट पाहत आहोतच आणि सर्व मंडळी बाप्पाच्या आगमनाच्या तयारी ला सुद्धा लागली असतील. नैवेद्याला गणपती बाप्पांना मोदक तर आवडतातच आणि त्यातून उकडीचे मोदक म्हटले की मग काय गरमागरम मोदकावर साजूक तुपाची धार !!

तर मंडळी , येत्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ सिंगापूर, उकडीच्या मोदकांचा workshop घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी. 

Safe  distancing चे नियम पाळून या workshop चे आयोजन केले गेले आहे. आपल्याला एका ठिकाणी फक्त ४ किंवा ५ जणींना एकत्र जमता येईल याची कृपया नोंद घ्यावी.

सूचना -

१. काही निवडक ठिकाणी workshop ची व्यवस्था केली आहे. तुम्ही तुमच्या घरा जवळचे ठिकाण workshop साठी निवडू शकता.

२. म मं सि सभासदांसाठी आणि अभ्यागत मंडळींसाठी खास सवलत - प्रत्येकी फक्त $१० - 

३. मोदकासाठी लागणारे सर्व साहित्य workshop च्या ठिकाणी आपल्याला पुरवले जाईल.

४. आपण हा workshop २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करणार आहोत. 

अधिक माहिती साठी अनुजा वर्तक(+65 91696871) आणि मीनल साटम (+65 88209835) ह्यांच्याशी संपर्क करा.

त्वरा करा आणि लवकर आपली नावनोंदणी करा.

आपली

म मं सि कार्यकारिणी


 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software