• Home
 • आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा!

आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा!

 • Sat, October 16, 2021
 • 4:00 PM - 6:00 PM
 • ZOOM
 • 0

Registration"आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा!"

मंडळाच्या सदस्यांसाठी विनामूल्य प्रवेश 


नमस्कार मंडळी , 

बघता बघता २०२१ उत्तरार्धात आले आणि दिवाळी ची लगबग सुरूही झाली!  

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, रांगोळ्या, भूपाळी, दिवाळी पहाट, भेटीगाठी आणि हो 'आकाश कंदील', किमान हे सर्व हवंच! आपल्याला इथे सुदैवाने आकाश कंदील मिळतात पण बरेचदा स्वतः बनवलेला आकाश कंदील लावायची इच्छा असून देखील वेळेअभावी ते करायचे राहून जातो. 

तर मंडळी , या दिवाळीचे औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी - "आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा".

सिंगापूर मधील सद्यस्थिती लक्षात घेऊन या  कार्यशाळेचे (workshop) चे आयोजन आपण ऑनलाइन माध्यमाद्वारे करत आहोत.आपल्या मंडळाचे सदस्य श्री. किशोर वामन आणि श्री. सिद्धेश हिर्लेकर आपल्याला आकाश कंदील बनवायची सोपी पद्धत शिकवणार आहेत.

सूचना -

१. केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांसाठी (ZOOM) झूम द्वारे ऑनलाईन कार्यशाळेची व्यवस्था केली आहे. 

२. सहभागासाठी किमान वय मर्यादा - ५ वर्षे. 

३. मंडळाचे सदस्य असणे बंधनकारक आहे.

४. कार्यशाळेसाठी नोंदणी केलेल्या सदस्यांना कंदील बनविण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची यादी सूचित केली जाईल..

५. आकाश कंदील बनवण्याच्या सामग्रीची व्यवस्था सहभागी सदस्यांनी स्वतः करायची आहे. 

६. आपण आपला सहभाग नोंदवण्यासाठी कृपया खालील लिंक वर कळवावे. 

७.  ही कार्यशाळा १६ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी  ४ ते ६  मध्ये आपण आयोजित करणार आहोत. 


अधिक माहिती साठी मिनल साटम (+65 88209835) ह्यांच्याशी संपर्क करा. 

त्वरा करा आणि लवकर आपली नावनोंदणी करा. नाव नोंदणीची शेवटची तारीख - रविवार, ३ ऑक्टोबर २०२१ 

आपली 

म मं सि कार्यकारिणी
“Diwali Lantern Making Workshop”

 Only for MMS Members - Free Entry


Namaskar Mandali,

We are entering Quarter 4 of 2021. Soon we shall see Diwali preparations taking pace!

Diwali always brings us joy and happiness through visiting friends, family get-togethers, crackers, gifts and  special snacks. Luckily we get lanterns in Singapore but making your own lantern is great fun. 

So get ready, this Diwali, MMS brings “Diwali Lantern Making Workshop” for our Members.

Looking at the current COVID situation in Singapore, we are organising an online “Diwali Lantern Making Workshop”. This workshop will be conducted by our MMS members Mr. Kishor Waman & Mr. Siddhesh Hirlekar.  

Information & requisites:

 1. ZOOM workshop shall be organised only for the members who register for the event.

 2. Who can participate - Members above age 5 years 

 3. Participants need to be MMS members.

 4. List of material required for Lantern making shall be provided to the participants.

 5. Material for making lantern needs to be arranged by the participants.

 6. Please register yourself the link given below

 7. This workshop will be conducted on Saturday 16th October 2021, 4-6 p.m. 


For any additional information please contact Minal Satam (+65 88209835).

Last date for registration is Sunday, 3rd October 2021! 


Warm Regards,

MMS Executive Committee 2021-22

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software