• About Us
  • मिरासलीला !! द मा मिरासदार यांच्या निवडक कथांचे अभिवाचन

मिरासलीला !! द मा मिरासदार यांच्या निवडक कथांचे अभिवाचन

  • Sun, June 12, 2022
  • 4:00 PM
  • 65

Registration

  • अभिवाचन दिग्दर्शनासाठी नावनोंदणी
    नोंदणीची अंतिम तारीख - २९ मे २०२२
  • अभिवाचनात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी.
    नोंदणीची अंतिम तारीख - २९ मे २०२२
  • प्रेक्षकांच्या नोंदणीची अंतिम तारीख - १० जून २०२२

Registration is closed

नमस्कार,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या नाट्यरंग उपक्रमांतर्गत घेऊन येत आहोत द मा मिरासदार ह्यांच्या कथांवर आधारित ....मिरासलीला!!!!

द मा मिरासदार ह्यांच्या इरसाल, खुसखुशीत, वात्रट व तितक्याच तरल व संवेदनशील कथा आपण सगळ्यांनीच अनेक वेळा वाचलेल्या आहेत.

त्यातल्याच काही निवडक कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम म्हणजेच...

मिरासलीला !!

तुम्हाला अभिवचन करण्यात रस आहे पण अनुभव नाही ? अहो काहीच हरकत नाही मंडळ तुम्हाला मार्गदर्शन करायला सज्ज आहे !!

तुम्हाला अभिनयाची आवड आहे ? तुमचे मराठी वाचन ओघवते आहे?

तुम्हाला अभिवाचनाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे?

अहो मग वाट बघू नका त्वरित तुमचा सहभाग नोंदवा.

कार्यक्रमाचा तपशील व काही सूचना खालीलप्रमाणेः

नावः मिरासलीला

वेळः १२ जून २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजता..

स्थळः महाराष्ट्र मंडळाची zoom meeting व Facebook live.

सूचनाः

१. कार्यक्रमाचे एकंदरीत समन्वयन व मार्गदर्शन नाट्यरंगतर्फे श्री. योगेश तडवळकर करतील.

२. कार्यक्रमात वाचल्या जाणाऱ्या कथांची निवड मंडळातर्फे केली जाईल.

३. ज्या क्रमाने प्रवेशिका येतील त्या क्रमाने कलाकारांची निवड केली जाईल ( First come first serve basis). कथांमधील पात्रसंख्येपेक्षा जास्त प्रवेशिका आल्यास उशीरा प्रवेश करणाऱ्यांची निराशा होऊ शकते.

४. कार्यक्रमाच्या आधी किमान २ तालमी होणे अपेक्षित आहे कलाकारांनी त्याप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.

५. भाग घेण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे.

६. कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. आपण सभासदत्व नूतनीकरण करण्यासाठी किंवा नवीन सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा

https://mmsingapore.org/apply-renew/

तर अधिक वाट न पाहता तात्काळ नावनोंदणी करून आपला सहभाग निश्चित करा!


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software