• Home
  • विविध गुण दर्शन - लोकजागर, गणेशोत्सव २०२२

विविध गुण दर्शन - लोकजागर, गणेशोत्सव २०२२

  • Sat, September 03, 2022
  • 6:30 PM
  • GIIS Punggol
  • 112

Registration

  • Ticket for all (Members and Non-Members).
    MEAL IS NOT INCLUDED.

Registration is closed


Book Tickets for लोकजागर

नमस्कार मंडळी,

गेल्या दोन वर्षांतल्या निर्बंधांचं विघ्न दूर होऊन ह्या वर्षी गणरायाचे धामधुमीत आगमन होत आहे आणि पूर्वीपेक्षाही जास्त उत्साहाने आपण त्याचे स्वागत करायचे आहे!

विद्याधिपती व कलाधीश अशा गणरायासमोर विविधप्रकारे आपले कलागुण साजरे करणे हा एक साफल्यसुखदायक सोहळाच असतो. ह्या वर्षीही महाराष्ट्र मंडळाचे सभासद आपले विविधकलागुणदर्शन सादर करणार आहेत. ह्या वेळच्या आपल्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना असेल

लोकजागर

समाजसुधारणे साठी झटणाऱ्या संतांचे अभंग, भारूड, ओव्या,

गावोगावी पाठीवर बाजापेटी घेऊन हिंडणाऱ्या तमाशा कलावंतांचे वग-लावण्या,

देवाला सोडलेल्या जोगते-जोगतिणींचे जोगवे,

वीरपुरूषांची स्तुती करणारे पोवाडे,

पोटासाठी भल्या पहाटे दारोदार फिरणाऱ्या वासुदेवाचे नाचगाणे,

लग्ना-बारशाच्यावेळी घातलेला वाघ्या-मुरळींचा गोंधळ,

जुलमी राजसत्तेवर संतापून गायलेली क्रांतीगीते,

संसाराचे गाडे ओढताओढता आयामायांनी माहेरच्या आठवणीने गायलेल्या ओव्या. अशा अनेक प्रकारचे कलाप्रकार यात सादर होतील

कार्यक्रमाचा तपशीलः

तारीखः ३ सप्टेंबर २०२२

वेळः सायंकाळी ४:३० वाजता

स्थळः GIIS Punggol

ह्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर तिकीटे काढून आपली उपस्थिती सुनिश्चित करावी ही विनंती!


Book Tickets for लोकजागर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software