• Home
  • ऋतुगंध - शिशिर प्रकाशन सोहळा

ऋतुगंध - शिशिर प्रकाशन सोहळा

  • Sat, February 18, 2023
  • 6:00 PM

Registration


Registration is closed


ऋतुगंध-शिशिर'ई अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण

नमस्कार माननीय लेखक/वाचक मंडळी,

आपण “ऋतुगंध शिशिर”या ई अंकासाठी आपले साहित्य पाठवून सहभागी झालात . काहींनी वाचक या भूमिकेतून ऋतुगंध अंकाला दाद दिली. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

आता सर्वाना कळवण्यास आनंद होत आहे की या अंकाचे काम पूर्ण झाले असून प्रकाशन १८ फेब्रुवारी २०२३ , शनीवार या दिवशी करण्याचे योजले आहे.

या प्रसंगी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका- माधवी कुंटे शुभेच्छा देणार असून आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री,सामाजिक शास्त्रज्ञ आणि साहित्यिका निशिगंधा वाड या अंकाच्या 'आई' या संकल्पनेविषयी दोन शब्द बोलणार आहेत.

स्थळ: Central green condominium, 1,Jalan Membina, Singapore 169479
तारीख: १८ फेब्रुवारी २०२३
वेळ: सिंगापूर सं. ६ वा. भारतीय वेळ दु. ३.३०

शिशिर आणि आई या संकल्पनेचे 'नातं' आपण या सोहळ्यात आणखी वृद्धिंगत करणार आहोत.

तेव्हा प्रत्यक्ष किंवा zoom वर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा ही विनंती .

कृपया आपली ‘प्रत्यक्ष’उपस्थिती आम्हाला लवकरच कळवावी त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे सोपे जाईल.

नोंदणी: https://mmsingapore.org/event-5159643
Email: Rutugandha@mmsingapore.org

धन्यवाद,
ऋतुगंध संपादन समिती
महाराष्ट्र मंडळ , सिंगापूर


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software