• Home
  • म.म.सि. गणपती देणगी 2023 - Donation

म.म.सि. गणपती देणगी 2023 - Donation

  • Tue, September 19, 2023
  • Tue, September 26, 2023

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed


गणपतीची देणगी इथे द्यावी
CLICK HERE for MMS Ganeshotsav '23 Donation

गणेशोत्सव 2023 - देणगी आवाहन

नमस्कार मंडळी,

गणेशोत्सव हा मंडळासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो. कार्यक्रम तिकिट, जाहिराती आणि ऐच्छिक देणग्या धरून जे उत्पन्न मंडळास मिळते त्यातून आपला बराच वार्षिक खर्च निघतो. प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी होणारा खर्च हा नक्कीच जास्त असणार आहे. मंडळाच्या सभासदांच्या उत्साहाला प्रोत्साहन देताना, आपली आर्थिक बाजू कमजोर पडणार नाही ह्याचा प्रयत्न आपली कार्यकारिणी करत आहेच, परंतु ही बाजू बळकट ठेवण्यास आपल्या सर्वांचा सहयोग हवा आहे.

गणेशोत्सवात ऐच्छिक देणगी देऊन आपण हातभार लावू शकता. Online देणगी देण्यासाठी या ई-मेल मधील लिंक वर click करा तसेच देणगी देण्यासाठी 
कार्यक्रम पत्रिकेमध्ये QR code देखील उपलब्ध आहे.

देणगीसाठी: https://mmsingapore.org/event-5396083/Registration

संक्षिप्त कार्य आढावा


मंडळी, या वर्षाची सुरुवात आपल्या मंडळातील नव-दांपत्याच्या हस्ते गुढी पूजनाने झाली. मार्च महिन्यात झालेला 'सहोदर' हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता. त्याचप्रमाणे जवळ जवळ 4 वर्षांनंतर यंदा महाराष्ट्र मंडळातर्फे दोन एकांकिका सादर करण्यात आल्या. 1 मे रोजी आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. या व्यतिरिक्त मे महिन्यात 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न झाला. त्यानंतर आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेला देखील अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तर नुकत्याच सादर झालेल्या अभंगवाणीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. आता मंडळाच्या महिला सदस्या येऊ घातलेल्या श्रावणसरी या मंगळागौर पूजनाच्या कार्यक्रमाची उत्साहाने वाट बघत आहेत.

या विशेष कार्यक्रमांच्या बरोबरच मंडळाच्या संवाद सिरीजला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऋतुगंध या मंडळाच्या द्वैमासिकाचे प्रकाशन सोहळे, तसेच शब्दगंध हा कवितांवरील मासिक कार्यक्रम अतिशय सुसूत्रतेने आयोजित होत आहेत. आपल्या हसत खेळत मराठी शाळेची सुद्धा खूप छान वाटचाल चालू आहे. प्रत्येक दोन महिन्यात आपल्या शाळेची सहल आयोजित केली जाते, ज्यामुळे मुलांना एकमेकांसोबत जास्तीत जास्त संवाद साधता येतो. 

विविध ठिकाणी CC इव्हेंट्स मध्ये वारली चित्रकला, साडी draping, मेहेंदी अशा कला प्रदर्शनासाठी मंडळ सहभागी होत आहे. आपल्या मंडळाच्या शिवनेरी ढोल ताशा पथकाचे कार्यक्रम तर अक्षरशः प्रत्येक आठवड्याला कुठल्या ना कुठल्या CC event अथवा सांस्कृतिक कार्यक्रमात होत आहेत. विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे इतर सामाजिक संस्थांसोबत आपल्या मंडळाचे संबंध अधिक दृढ होत आहेत. मंडळाच्या स्मरणिका - दिवाळी विशेष अंकाची तयारी सुद्धा जोमाने सुरु आहे, विषय आहे 'निसर्गराजा ऐक सांगतो'.

अधिक माहितीसाठी मंडळाच्या संकेत स्थळाला भेट द्या: https://www.mmsingapore.org/events

सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी

गणेशोत्सव 2023 - कार्यक्रम पत्रिका


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software