• Home
  • विविध गुण दर्शन, गणेशोत्सव २०२३ - दर्शक

विविध गुण दर्शन, गणेशोत्सव २०२३ - दर्शक

  • Sat, September 23, 2023
  • 4:00 PM
  • GIIS Punggol

Registration

  • Bento Box will be distributed after program

Registration is closed

नमस्कार मंडळी,

गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गणरायाचे आगमन एकदम धूमधडाक्यात होत आहे आणि अजून जास्त उत्साहाने आपण त्याचे स्वागत करायचे आहे! विद्याधिपती व कलाधीश अशा गणरायासमोर विविधप्रकारे आपले कलागुण साजरे करणे हा एक साफल्यसुखदायक सोहळाच असतो. ह्या वर्षीही महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी हा विविध गुणदर्शन सोहळा साजरा करण्याची सुसंधी घेऊन येत आहे.

ह्या वेळच्या आपल्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे:

निसर्गराजा...


निसर्ग सौंदर्याने नटला हा आपुला परिसर..

फळा फुलांनी वनौषधींनी सजला की सुखकर..

मंडळी, निसर्गा सोबतचं आपलं नातं अतूट आहे. निसर्ग हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. ईश्वराने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे निसर्ग.

या निसर्गदेवतेच्या माध्यमातूनच आपण आपल्या भक्तीमय भावना परमेश्वराला समर्पित करीत असतो. पहा ना, लाडक्या गणरायाला आवडणा-या दुर्वा, फुले, फुलांचे हार-सजावट, शुद्ध जल, औषधी गुणधर्मयुक्त पत्री, जंगलातून मिळणारे मध, कल्पवृक्षाचे श्रीफळ आणि विविध फळे आपण अर्पण करतो. सहस्त्रहातांनी देणारा हा निसर्ग आणि म्हणूनच यावर्षी गणरायाची आराधना करताना सादर होणाऱ्या प्रत्येक कलाविष्कारातून निसर्गाचं अनोखं दर्शन होणं अपेक्षित आहे याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.


कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणेः

तारीखः 23 सप्टेंबर 2023 (शनिवार)

वेळः सायंकाळी 4.00 वाजता

स्थळः GIIS Punggol


तर लवकरात लवकर आपली तिकीट बूक करा. 


Note:

1. Free Seating Arrangement in GIIS Punggol Arrangement

2. Bento Box will be distributed after event (If booked online)

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software