• Home
  • म.मं.सिं. Karaoke

म.मं.सिं. Karaoke

  • Sat, December 30, 2023
  • 5:30 PM
  • Function Room, 2 Bedok Reservoir View, 479232

Registration


Registration is closed

म.मं.सिं. Karaoke

नमस्कार मंडळी,

आपल्या सगळ्यांनाच कधी फावल्या वेळात, कधी काम करत असताना, कधी मित्र-मैत्रिणीं सोबत असताना, तर कधी आपल्या लहानग्यांसाठी गाणी गायची आवड असते. पण बहुतेकांना ही आवड आणि कला सादर करण्याची संधी या ना त्या कारणाने मिळत नाही.  

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर अशा संगीत प्रेमींसाठी एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे, "म.मं.सिं. Karaoke". कार्यकारिणीची तर इच्छा आहे की हा उपक्रम सिंगापूर च्या चारही टोकांना दर दोन महिन्यांनी तरी चालवावा.  

मंडळाचा पहिला कराओके कार्यक्रम योजिला आहे ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता. तुम्हाला गायनाची आवड असेल तर लवकरात लवकर नावनोंदणी करा. 

कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे. 

दिवस: ३० डिसेंबर २०२३ (शनिवार) 
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता  
ठिकाण: Function Room, 2 Bedok Reservoir View, 479232

१. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे
२. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी (गायक अथवा प्रेक्षक) मंडळाचं सदस्यत्व असणं गरजेचं आहे.

नावनोंदणी - https://www.mmsingapore.org/event-5538185

लवकरच भेटूयात मग !

धन्यवाद,  

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software