• Home
  • म.मं.सिं. - चित्रकला प्रदर्शन

म.मं.सिं. - चित्रकला प्रदर्शन

  • Sat, June 29, 2024
  • 9:00 AM - 11:45 AM
  • Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529944
  • 2

Registration

म.मं.सिं. - चित्रकला प्रदर्शन (29 जून 2024)


नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर प्रस्तुत करत आहे आपल्या गुणी कलाकारांच्या चित्रकलेचं प्रदर्शन! या प्रदर्शनात कलाकार म्हणून सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करावी ही विनंती. 

त्याचबरोबर, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांसाठी वारली चित्रकलेचा बूथ ठेवण्याचे मंडळाचे प्रयोजन आहे. तर सगळ्यांनी या अभिनव प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या कलाकारांचे कौतुक करावे. 

दिवस - २९ जून २०२४

वेळसकाळी ९.०० ते ११.४५

स्थळMelville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529944

इच्छुक कलाकारांसाठी सूचना

१. कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. आपण सभासदत्व नूतनीकरण करण्यासाठी किंवा नवीन सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा - https://mmsingapore.org/apply-renew/

२. नावनोंदणीची अंतिम तारीख - २३ जून २०२४ (रविवार)

३. जास्तीत जास्त ५ चित्रांचे प्रदर्शन करता येईल. 

४. प्रदर्शनात आपल्या कलाकृतींची विक्री करण्यास मनाई आहे. 

५. कलाकारांच्या सहभागा संदर्भातील अंतिम निर्णय समितीचा असेल.   

आपणास प्रदर्शना संदर्भात काही प्रश्न असल्यास समिती समन्वयक शीतल धारूरकर (8189 7501) यांच्याशी संपर्क साधावा. 

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software