महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेवून येत आहे… “सोबतीचा करार” – शब्द, स्वर आणि संवेदनांची अविस्मरणीय मैफल कविता आणि संगीत जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा जन्माला येतो “सोबतीचा करार” प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्या हृदयस्पर्शी कवितांचा आणि गझलांचा हा खास आविष्कार — त्यांच्या स्वतःच्या आवाजात! त्याचबरोबर या शब्दयात्रेत अनुभवता येणार आहे… आशिष मुजुमदार यांचे मधुर संगीत, दत्तप्रसाद रानडे यांचा भावस्पर्शी स्वर, निनाद सोलापूरकर यांचे सिंथेसायझरवरील सुरेल योगदान, अमोद कुलकर्णी यांची तबला व ढोलकीची तालसंगत आणि गिटारच्या नाजूक स्वरांची साज. महाराष्ट्रभर १५० हून अधिक प्रयोगांनी रसिकांची मने जिंकलेला हा कार्यक्रम घेवून येत आहोत खास तुमच्यासाठी… दिवस आणि वेळ: शनिवार, 14 मार्च 2026, दुपारी 4:00 वाजता. स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः Ticket - Members / Non-members Platinum - SGD 55.00 / 65.00
Gold - SGD 45.00 / 55.00
Above Price does not include Bento Box
Bento Box - SGD 15 (Additional charges) Bento Box will be served after the event.
मैत्री, प्रेम आणि आयुष्यातील नाजूक भावना — जणू जवळच्या मित्रांसोबत गप्पांची मैफलच! ही खास मैफल अनुभवण्यासाठी नक्की या…
धन्यवाद!
म.मं.सिं. कार्यकारिणी
NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.
** IMDA व इतर संलग्न अधिकारी यांची मंजुरी * महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699