• Home
  • आकाश कंदील कार्यशाळा - दिवाळी विशेष! (Diwali Lantern Workshop)

आकाश कंदील कार्यशाळा - दिवाळी विशेष! (Diwali Lantern Workshop)

  • Sat, October 08, 2022
  • 3:00 PM - 5:00 PM
  • ZOOM
  • 47

Registration


Registration is closed


आकाश कंदील कार्यशाळा - दिवाळी विशेष!

नमस्कार मंडळी,

अंधाराचा भेदून गाभा पुसण्या अशुभाची सावली
लक्ष लक्ष उजळत दीप आली आली दीपावली!

आश्विन अमावस्येच्या रात्री आकाशात उंचावर आकाशकंदील बांधून अंधारावरचा विजय साजरा करण्याचा सण म्हणजे दिवाळी! आपल्या हाताने आपल्याला हवा तसा एकमेवाद्वितीय आकाशकंदील बनवून अभिमानाने तो घराच्या दारावर टांगण्यात एक वेगळाच आनंद असतो!

म्हणूनच आपल्या बालगोपाळांसाठी व मोठ्यांसाठीही महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे

आकाशकंदील कार्यशाळा”!

तुम्हाला जर ह्या कार्यशाळेत भाग घ्यायचा असेल तर सत्वर महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करा.

लिंक व बाकी तपशील खाली दिलेला आहे. चला तर मग, लगेच नावनोंदणी करून सुंदर सुंदर आकाशकंदील बनवण्याचा आनंद लुटूया!!

तारीख: शनिवार8 ऑक्टोबर 2022,
वेळः 3:00 PM ते  5:00PM
स्थळः ऑनलाइन झूम
नोंदणीची शेवटची तारीख - बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
नावनोंदणीः
 https://mmsingapore.org/event-4984906

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

सूचना -

१. केवळ नोंदणी केलेल्या सर्वांसाठी (ZOOM) झूम द्वारे ऑनलाईन कार्यशाळेची व्यवस्था केली आहे.
२. सहभागासाठी किमान वय मर्यादा - ५ वर्षे.
३. कार्यशाळेसाठी कंदील बनविण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची यादी सूचित केली जाईल.
४. आकाश कंदील बनवण्याच्या सामग्रीची व्यवस्था सहभागी सदस्यांनी स्वतः करायची आहे.
५. आपण आपला सहभाग नोंदवण्यासाठी कृपया खालील लिंक वर कळवावे.
६. ही कार्यशाळा 08 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी 3:00 ते 5:00 मध्ये आपण आयोजित करणार आहोत.
७. नाव नोंदणीची शेवटची तारीख - बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 
 

अधिक माहिती साठी संपर्क
किशोर वामन  +65 8308 0475

त्वरा करा आणि लवकर आपली नावनोंदणी करा. 

Diwali Special - Lantern Making Workshop


Namaste,


Diwali is all about celebrating victory over darkness by lighting beautiful and dazzling lanterns and lamps. This year let us all celebrate yet another victory over darkness and what better way than to create our own lanterns to represent our joy and gratitude?


Maharashtra Mandal Singapore presents an unique opportunity to learn how to make lanterns. Please join us at the *“Lantern Making Workshop”!*

It is a great fun activity for kids and adults too!

So what are you wanting for? Register your name at the link given below!


Date: Saturday , 8 October 2022,

Time 3:00 PM To 5:00 PM

Venue: Zoom meeting 

Registration: https://mmsingapore.org/event-4984906*

Registration closes on Wednesday , 5 October 2022.


See you!


Thank you,

Maharashtra Mandal Singapore.

Please note -

1.The event is available only for registered participants on Zoom.

2. Minimum age limit of 5 years applies.

3. The members of Maharashtra Mandal and non members are allowed to participate. It’s open for all.

4. A list of items required will be sent in advance to the registered participants.

5. Participants are expected to arrange for the items required to make lanterns.For more information, contact:

Kishor Waman  +65 8308 0475

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software