• Home
  • Shravansari 2023 - Mangalagaur Games and Shravan Haladi Kunku Programme by MMS

Shravansari 2023 - Mangalagaur Games and Shravan Haladi Kunku Programme by MMS

  • Tue, September 05, 2023
  • 6:00 PM - 9:00 PM
  • Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529944
  • 32

Registration


कार्यक्रम: श्रावणसरी (मंगळागौर पूजा व आरती, खेळ व स्नेहभोजन)

दिनांक: 5 सप्टेंबर 2023

वेळ: सायंकाळी 6 ते 9

स्थळ: Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529944.

नमस्कार मैत्रिणींनो,

मराठी संस्कृती मधे सणवार-व्रतवैकल्ये यांना विशेष महत्व आहे. श्रावणापासून हे सणवार सुरू होतात आणि म्हणून या महिन्याला सणवारांचा राजा असे संबोधले जाते. प्रत्येक वाराचे श्रावणात खास स्थान आहे. राखी पौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, शुक्रवारचे हळदीकुंकू म्हणजे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण. गेले तीन वर्ष कोविडमुळे श्रावण हवा तास साजरा  होऊ शकला नाही आणि म्हणूनच की काय पण यावर्षी  कधी नव्हे तो अधिक श्रावण आपल्याला लाभला आहे. या 2023 च्या श्रावणाच्या  आनंदात अजून थोडी भर घालण्यासाठी 'श्रावणसरी' या मंगळागौरीच्या पूजेचे, खेळांचे आणि हळदीकुंकूं कार्यक्रमाचे आयोजन मंडळाने केलेल आहे.


मंगळागौर ही एक पारंपरिक सौभाग्यदात्री देवता मानली जाते. लग्नानंतर पुढे पाच किंवा सात वर्षे विवाहित मुली श्रावणातल्या मंगळावारी हे व्रत करतात. या व्रतात शिव आणि गणपती यांच्यासह गौरीची पूजा केली जाते. गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच. श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे.

हल्ली बरेचदा मुल्लींना माहेरी जाता येते. मोबाईल फोन आणि Whatsapp मुळे सतत संपर्क असतो. पण पूर्वी असे नव्हते. वर्षभर सासरी नांदणाऱ्या या माहेरवाशीणींना श्रावणात मात्र हक्काने माहेरी जाता यायचे. आता काळ बदलला असला तरी मंगळागौर जागवणे, नाच - खेळ, नटणे, मैत्रिणींना भेटणे - हसणे - खिदळणे, मेहेंदी काढणे ,हळदी कुंकू याची मजा आजही तेवढीच आहे.

चला तर मग, तुमच्या नऊवारी साड्या आणि सुंदर पैठण्या नेसून झिम्मा, फुगडी, गोफ असे विविध खेळ खेळायला, बाईपण साजरं करायला जरूर या बरं का!

कार्यक्रमाची रूपरेषा:

संध्याकाळी 6:00 ते 7:00 - मंगळागौर पूजा व आरती 

संध्याकाळी 7:00 ते 8:15 - खेळ

संध्याकाळी 8:15 ते 9:00 - जेवण


तिकीट दर:

ममसिं सभासद (स्त्रिया) - $30

पाहुणे स्त्रिया (Non-Member) - $40

मुले (12 वर्षा खालील) - $20


५ वर्षाखालील मुलामुलींना - तिकीट नाही.

तिकीट दरात जेवण समाविष्ट असून प्रत्येक तिकिटाला केवळ एकच बेन्टो बॉक्स मिळेल.


मर्यादित जागा! लवकरात लवकर तिकिटे नोंदवून टाका 

https://www.mmsingapore.org/event-5337161


सस्नेह,

आपली कार्यकारिणी

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software