• Home
  • दिवाळी स्वरसंध्या 2026 - आशाताईंना सुरेल मराठी अभिवादन!

दिवाळी स्वरसंध्या 2026 - आशाताईंना सुरेल मराठी अभिवादन!

  • Sat, November 07, 2026
  • 4:00 PM
  • Leadership Hall, Block-A, S.P. Jain School of Global Management, 10 Hyderabad Road, SG-119579
  • 129

Registration

  • MMS Member
  • Non Member

Register



दिवाळी स्वरसंध्या – आशाताईंना सुरेल मराठी अभिवादन

!! तिकिटे लवकर बुक करा !!


नमस्कार मंडळी,

या दिवाळीत आपण सर्वजण एकत्र येऊन एका खास सांगीतिक सोहळ्याचा आनंद घेणार आहोत  - "स्वरसंध्या" !

स्वरसम्राज्ञी कै.आशा भोसले यांच्या अजरामर गाण्यांना वाहिलेली ही आदरांजली शनिवार, 7 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे. आपल्याच मंडळातील हौशी गायक आणि वादक गेले अनेक आठवडे मन लावून सराव करत आहेत आणि त्यांनी तयार केलेली ही संगीतमय मैफल तुमच्या मनात आशाजींच्या सुरेल आठवणी नक्कीच ताज्या करेल.

कार्यक्रमाचा तपशील व रूपरेषाखालील प्रमाणे:  

दिवस: शनिवार,07 नोव्हेंबर 2026

वेळ: सायं 4 वाजता 

ठिकाण: Leadership Hall, S.P. Jain School of Global Management, SG-119579

1. स्वरसंध्या: मंडळाच्या स्थानिक कलाकारांकडून, आपल्यासाठी आशाताईंच्या मराठी गीतांचा सुरेल नजराणा

2. स्मरणिका प्रकाशन: स्मरणिका हा आपला फार मोठा उपक्रम असतो, या दिवशी आपण यावर्षीच्या स्मरणिकेचं प्रकाशन करून स्मरणिका चमूचं कौतुक करूया. 

3. दिवाळी फराळ: स्वादिष्ट फराळाचा आस्वाद घ्या!


नावनोंदणी शुल्क:

म.मं.सिं. सभासद - S$10

सभासदेतर - S$15

12 वर्षांखालील सर्व मुलांना प्रवेश निःशुल्क

आशाताईंच्या सुरांनी नटलेली भक्तिगीते, भावगीते, लावणी, चित्रपटगीते आणि युगुलगीते....एक संपूर्ण संध्याकाळ फक्त त्यांच्या अजरामर आवाजाच्या स्मरणात!

️जागा मर्यादित आहेत, त्यामुळे निराशा टाळण्यासाठी खालील लिंकवरून लवकरात लवकर नावनोंदणी करा:

https://www.mmsingapore.org/event-6032878

अधिक माहितीसाठी खालील समन्वयकांशी संपर्क साधा.

अजित वैद्य:  +65 98807981

ऋत्विक पेठे: +65 83639901

आपल्या सर्वांच्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

धन्यवाद,
मंमंसि कार्यकारिणी

Download Member's App
IOS / Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software