जे जे उत्तम साहित्यवाचन संकल्पना: अभिजात भाषा-वारसा आणि भविष्य गणेशोत्सव म्हणजे उत्साह, आनंद आणि एक नवी ऊर्जा. गणरायाच्या आगमनाबरोबरच आपण प्रत्येकवेळी नवा उत्साह, नवा विचार आणि नवी दिशा अनुभवतो. यावर्षी महाराष्ट्र मंडळाने आपल्या जे जे उत्तम कार्यक्रमाची मुख्य संकल्पना निवडली आहे – “अभिजात भाषा-वारसा आणि भविष्य”. गेल्या वर्षीच भारत सरकारने मराठी भाषिकांची एक जुनी मागणी मान्य करत इतर ४ भाषांबरोबर मराठीला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला. या संकल्पनेशी सुसंगत असे विविध साहित्य—कविता, कथा, लेख—आपण या सोहळ्यात सादर करणार आहोत. प्रत्येक सादरीकरणात अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कारणीभूत वारसा आणि त्या संदर्भात माहिती तसेच मराठी भाषेचा पुढचा प्रवास या विषयीचे विचार मांडले जातील. चला तर मग, या वर्षीच्या गणेशोत्सवात आपण या विषयाशी निगडित साहित्यवाचनाचा आनंद एकत्र अनुभवूया. कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः तारीखः 30 ऑगस्ट 2025 वेळः सकाळी 11 वाजता स्थळः 2 OWEN ROAD, Farrer Park, Singapore 218842 (लिटल इंडिया येथील खुल्या प्रांगणात-गणेशोत्सव मांडवात) नाव नोंदणीची अंतिम तारीख: 24 ऑगस्ट 2025 साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीखः 27 ऑगस्ट 2025
सहभागी वाचकांची मर्यादा : 15 नोंदणी: https://mmsingapore.org/event-6304093
तर मंडळी, मग वाट कसली पाहताय? लवकरात लवकर तुम्हाला आवडलेल्या अशा उत्तम साहित्यकृतीचा आनंद इतरांना देण्यासाठी वाचक म्हणून आपले नाव नोंदवा. नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी खालील समन्वयकांना संपर्क करावा. अजित वैद्य- 98807981 सस्नेह,
म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699