• Home
  • आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६

  • Sun, June 21, 2026
  • 10:00 AM - 11:00 AM
  • Costa Del Sol, Function Hall, 469989
  • 11

Registration


Register


आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६


नमस्कार मंडळी,

नवीन वर्ष सुरु होण्याची चाहूल लागली की आपण सगळेच, काहीतरी  संकल्प करूया, असा विचार करतो. संकल्प करतो सुद्धा. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्ती प्रमाणे कधी कधी तो मागेही पडतो.

असाच, "मी नवीन वर्षात रोज सकाळी योग करीन" असा तुमचा संकल्प मागे पडला असेल तर, तो पुनःश्च सुरु करण्याची वेळ आणि संधी आपल्याला मिळणार आहे.

त्यासाठीच, जागतिक योग दिवस २१ जून चे औचित्य साधून, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि Mpowered with Mrudul आपल्यासाठी घेऊन येत आहेत.....

"एक सजग सुरुवात" (A conscious reset)आरोग्य, संतुलन आणि सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक सवयी जाणून घ्या.


दिवस : २१ जून २०२६ (रविवार)

वेळ: सकाळी १० ते ११

स्थळ: Costa Del Sol, Function Hall, 469989


महत्वाच्या सूचना:

१. आपली योगा मॅट व पाण्याची बाटली सोबत आणावी.

२. प्रवेश विनामूल्य असेल.

३. मंडळाचे सदस्यत्व आणि नावनोंदणी आवश्यक आहे.

नावनोंदणी -  https://www.mmsingapore.org/event-6708347

चला तर मग, अधिक निरोगी आणि आनंदी जीवनशैली स्वीकारण्यासाठी एकत्र येऊया.

धन्यवाद,

म.मं.सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software