नमस्कार मंडळी,
लेखक आणि वाचक या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूशिवाय दुसरी बाजू अपूर्ण असते. आपले नाणे खणखणीत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही बाजूंची उपस्थिती महत्त्वाची असते.
‘ऋतुगंध-वसंत २०२६’ चा प्रकाशन समारंभ काही कारणांमुळे सध्या प्रत्यक्ष उपस्थितीत आयोजित करता येत नसल्याने यावेळी डिजिटल अंक प्रकाशित करतोय.
डिजिटल अंकाची लिंक : https://mmsrutugandha.wordpress.com/rutugandha-latest-edition/
तसेच लेखक आणि वाचक यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही ‘शब्दऋतू’ अभिवाचन कार्यक्रम आयोजित करत आहोत. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वाचकांना त्यांच्या स्वरचित लेख, कथा किंवा कवितेतील निवडक आणि महत्त्वाचा भाग सादर करायचा आहे.
दिवस: शनिवार, ६ जून २०२६
वेळ: दुपारी १.३० ते ४.३०
स्थळ: झूम
महत्त्वाचे:
सोबत दिलेल्या नोंदणी दुव्यावर आपले नाव लवकरात लवकर नोंदवा आणि या अभिवाचन कार्यक्रमात सहभागी व्हा.
नाव नोंदणीसाठी इथे क्लिक करा:
https://www.mmsingapore.org/event-6715590
सस्नेह,
ऋतुगंध समिती, महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699