म.मं.सिं. Karaoke
नमस्कार मंडळी,
तुम्ही एक अनुभवी गायक/गायिका आहात का?
नाही? नसाल तरी हरकत नाही.
कारण महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे, "MMS Karaoke Eve", गाण्याची आणि संगीताची आवड असलेल्या सर्वांसाठी!
तुम्हाला जी गाणी सादर करण्याची तीव्र इच्छा आहे, ती तुम्ही बिनधास्तपणे सादर करू शकता. कृपया लवकरात लवकर नोंदणी करा, जेणेकरून आपल्याला सर्व गायकांना सामावून घेता येईल.
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे:
दिवस: २६ जून २०२६ (शुक्रवार)
वेळ: सायं. ६ वाजता
ठिकाण: 150 Thomson Road, Thomson Euro-Asia Condo, Function Room,
SG - 307605
१. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. २. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी (गायक अथवा प्रेक्षक) मंडळाचं सदस्यत्व असणं गरजेचं नाही (हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे). परंतु सभासदेतर इच्छुक गायकांसाठी फक्त ठराविक जागा शिल्लक ठेवल्या आहेत.
अधिक माहितीसाठी खालील समन्वयकांना संपर्क करा.
अजित वैद्य : ९८८०७९८१
आशिष प्रधान : ९२७६३०५३
नावनोंदणी - https://www.mmsingapore.org/event-6719984
मनसोक्त गाण्यासाठी आणि संगीत व मनोरंजनाने भरलेल्या संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा!
तुमची आवडती गाणी, तुमचा उत्साह आणि मित्र-मैत्रिणींना घेऊन या!
धन्यवाद,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699