एका हरहुन्नरी कलाकाराचा प्रवास - मीना नाईक
नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या 'संवाद' मालिकेतील पुढील सत्रासाठी आपणास मनःपूर्वक आमंत्रण!
या सत्रात आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका आणि पारंपरिक कठपुतळी कलेच्या अभ्यासक मीना नाईक. मराठी चित्रपट, बालरंगभूमी, शिक्षण, सामाजिक कार्य आणि कठपुतळी कलेतील त्यांच्या बहुआयामी योगदानामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या सदस्य, लेखिका आणि साहित्यप्रेमी मोहना कारखानीस यांच्याशी संवाद साधताना, मीना नाईक आपल्या लेखन, दिग्दर्शन, कठपुतळी कला, बालरंगभूमी आणि त्यांच्या समृद्ध जीवनप्रवासातील अनेक प्रेरणादायी अनुभव उलगडून सांगतील.
या प्रेरणादायी संवादाचा आपण नक्की भाग व्हाल हीच अपेक्षा.
दिनांक: रविवार, 12 जुलै 2026
वेळ: दुपारी 1.30 वाजता
स्थळ: Zoom
समन्वयक: मोहना कारखानीस
नोंदणी करण्यासाठी कृपया खालील लिंकचा वापर करा:
आपल्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699