• Home
  • म.मं.सिं. Karaoke (ऑगस्ट २०२६)

म.मं.सिं. Karaoke (ऑगस्ट २०२६)

  • Fri, August 28, 2026
  • 6:00 PM
  • The Tropica Function Hall Tampines Avenue 1 Singapore 529777
  • 13

Registration


Register


म.मं.सिं. Karaoke


नमस्कार मंडळी,

आपल्या मंडळाचा कराओके उपक्रम तुम्हाला किती आवडतो आणि तुम्ही त्याची किती आतुरतेने वाट पाहत असता, हे वेगळं सांगायलाच नको! २६ जूनच्या कार्यक्रमानंतर सर्व गायक आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहून आम्हाला पक्की खात्री होती की तुम्ही पुढच्या कार्यक्रमासाठी लगेच तयार असणार!

तुमच्या याच आग्रहा खातर आम्ही पुढची तारीख नक्की केली आहे.आम्हाला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा आठवड्याची कामाची धावपळ आणि ताण विसरून हिंदी-मराठी गाण्यांच्या या मैफिलीत सामील व्हायला उत्सुक आहात. 

म्हणूनच, तुम्ही नक्की येणार हे गृहीत धरून आम्ही नोंदणी सुरू करत आहोत!

लवकरच खाली दिलेल्या लिंकवरून आपली नोंदणी करा!

कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे:

दिवस:२८ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार) 

वेळ: सायं. ६ वाजल्यापासून

ठिकाणThe Tropica Function Hall Tampines Avenue 1 Singapore 529777

१. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
२. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी (गायक अथवा प्रेक्षक) मंडळाचं सदस्यत्व असणं गरजेचं नाही (हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे). परंतु सभासदेतर इच्छुक गायकांसाठी फक्त ठराविक जागा शिल्लक ठेवल्या आहेत.

अधिक माहितीसाठी खालील समन्वयकांना संपर्क करा.

अजित वैद्य : ९८८०७९८१

आशिष प्रधान : ९२७६३०५३ 

नावनोंदणीhttps://www.mmsingapore.org/event-6786608


मनसोक्त गाण्यासाठी आणि संगीत व मनोरंजनाने भरलेल्या संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा!

तुमची आवडती गाणी, तुमचा उत्साह आणि  मित्र-मैत्रिणींना घेऊन या!

धन्यवाद,  

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software