नमस्कार पालक हो,

सिंगापूरमधे आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक जुने स्वप्न आणि पालकांची मागणी होती. त्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न मंडळाने मागील वर्षी यशस्वीरीत्या केला. या उपक्रमाला पालकांचा, शिक्षकांचा, आणि स्वयंसेवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतो आहे की शनिवार, ५ मे २०१८ पासून मराठी शाळेचे दुसरे वर्ष नव्या जोमाने सुरु होत आहे. शिक्षक व स्वयंसेवक यावर्षी पुन्हा सुरु होणाऱ्या शाळेच्या तयारीला लागलेले आहेत.

नवीन गोष्ट म्हणजे, मंडळाने नुकताच भारती विद्यापीठ, पुणे यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भारती विद्यापीठ आपल्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, पुस्तके आणि परीक्षा प्रमाणपत्रे देणार आहे.

'हसत खेळत मराठी' चे धोरण असे आहे:

  • शाळेत मराठी वाचणे, बोलणे शिकवले जाईल. 
  • आधी नमूद केल्याप्रमाणे यावर्षी भारती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित शाळा चालेल. (परीक्षेबद्दल अधिक माहिती नंतर दिली जाईल)
  • मराठी संस्कृती, सण आणि उत्सव याची माहिती करून देणे ह्यावरही भर असेल. गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प अशा माध्यमांमधून मुलांना मराठी शिकवले जाईल.
  • शाळा जरी मे २०१८ मधे सुरु होत असली तरी शाळेत प्रवेश मार्च २०१९ पर्यंत कधीही घेता येईल.
  • प्रवेश घेतला की पूर्ण फी लागू होईल.
नावनोंदणीसाठी माहिती खालील प्रमाणे:

शाळेची वेळ: दर शनिवारी दुपारी २ ते ४ (५ मे २०१८ पासून)
वयोगट:  ते १३
स्थळ:  एस पी जैन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, १० हैदराबाद रोड (10 Hyderabad Rd, Singapore 119579)

प्रवेश शुल्क (पुस्तके व परिक्षा फी धरून) : १०० $ वार्षिक (१ मे २०१८ ते ३० एप्रिल २०१९)
साधने: पेन्सिल बॉक्स शिवाय कोणत्याही साधनांची गरज नाही. भारती विद्यापीठाने पुरविलेली पुस्तके प्रवेश प्रक्रियेच्या वेळी दिली जातील.

टीप: ११ वर्षापर्यंतच्या मुलाच्या कमीतकमी एका पालकाचे व १२ पूर्ण मुलाचे स्वतःचे ममंसिं सभासदत्व असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा सचिन जंगम यांना +६५-८१३५३४२५ वर किंवा marathishala@mmsingapore.org वर.

सस्नेह,
आपली,
ममंसिं कार्यकारिणी

Enrol Your Child

  • No upcoming events

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software