म.मं.सि. दिवाळी विशेष 2025
नमस्कार मंडळी!
दसरा झाला की सगळ्यांच्या मनात निर्माण होतो दिवाळीचा उत्साह!
आकाशकंदील, किल्ले, फराळ आणि सणाची लगबग सुरूच झाली आहे…आणि त्याच आनंदात म.मं.सिं. घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास दिवाळीची मेजवानी!
यासोबतच कार्यकारणी एक विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे.
"म.मं.सि. - दिवाळी विशेष 2025"
या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टींचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे.
1. दिवाळी फराळ व फॅशन शो (पारंपरिक वेशभूषा) - स्वादिष्ट फराळाचा आस्वाद घ्या आणि तुमच्या सुंदर पारंपरिक पोशाखात फॅशन शो मध्ये भाग घेऊन जिंका खास पारितोषिकं!
2. स्मरणिका प्रकाशन - स्मरणिका हा आपला फार मोठा उपक्रम असतो, या दिवशी आपण यावर्षीच्या स्मरणिकेचं प्रकाशन करून स्मरणिका चमूचं कौतुक करूयात.
3. कराओके -आपल्या हौशी गायकांच्या आवाजात – मराठी गीतांचा मोहक नजराणा. नावनोंदणी करा आणि सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्या!
4. गणपती आरास स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ - गणरायाच्या स्वागतासाठी केलेल्या आरास स्पर्धेचा निकाल!
5. नाट्यस्पर्धा – पारितोषिक वितरण: रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज आयोजित विश्व एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, सिंगापूरच्या ‘हे गेले’ आणि ‘नेवर माइंड’ या एकांकिकांनी भरघोस पारितोषिके मिळवली आहेत. या यशस्वी कलावंतांचा सन्मान!
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे:
दिवस: शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
वेळ: सकाळी 9.00 - 11.00
ठिकाण: Leadership Hall, S.P. Jain School of Global Management, SG-119579
- मंडळाच्या सभासदांसाठी प्रवेश मोफत.
- 12 वर्षां वरील इतर पाहुण्यांसाठी (Non-Member) प्रवेश - S$10 - या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. फक्त नावनोंदणी केलेल्यांसाठी मंडळाकडून आयोजिलेल्या दिवाळी फराळाची व्यवस्था करण्यात येईल.
- महत्वाची विनंती: कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खात्री असल्यासच नोंदणी करावी हि विनंती. नोंदणी करून न आलेल्या सदस्यांकडून $10 शुल्क आकारले जाईल.
नाव नोंदणीसाठी आणि कराओके मध्ये भाग घेण्यासाठी -
https://mmsingapore.org/event-6382263
अधिक माहितीसाठी :
सुचित्रा जंगम - 9272 4541 अजित वैद्य - 9880 7981
चला तर मग लवकरात लवकर नावनोंदणी करा आणि म.मं.सि. दिवाळी विशेष 2025 या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699