• Home
  • म.म.सि. गणपती देणगी 2022 - Donation

म.म.सि. गणपती देणगी 2022 - Donation

  • Wed, August 17, 2022
  • Mon, September 05, 2022

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed


गणपतीची देणगी इथे द्यावी
CLICK HERE for MMS Ganeshotsav '22 Donation

गणेशोत्सव २०२  - देणगी आवाहन

नमस्कार मंडळी,

गणेशोत्सव, मराठी माणसाच्या मनाला उभारी देणारा उत्सव. मंडळी, श्रीगजानन कृपेने आपण या वर्षी गणेशोत्सव प्रत्यक्ष भेटून साजरा करणार आहोत. तरीही आपल्याला "safe distancing" चे पालन स्वयंशिस्तीने करावे लागणार आहे.

या वर्षाची सुरवात पावनखिंड या चित्रपटाने अतिशय जल्लोषात झाली, त्यानंतर लगेचच बॉक्स क्रिकेट स्पर्धेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. मंडळाच्या संवाद सिरीज ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, तसेच मिरसलीला या द मा मिरासदार यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम सादर केला गेला. ऋतुगंध या मंडळाच्या द्वैमासिकाने यंदा अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला. या वर्षीचे विशेष म्हणजे मंडळाच्या ढोल ताशा पथकाची स्थापना.

मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशभक्तांना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. वयवर्षे १२ पुढील व्यक्तींचे Covid vaccination पूर्ण झालेले असणे जरुरीचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.

या वर्षीचा गणेशोत्सव अतिशय खास असणार आहे कारण श्रीमंत दगडूशेठ प्रतिष्ठानाने आपल्याला मूर्ती भेट म्हणून दिली आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. विविध गुण दर्शन हा मंडळाच्या स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन सभागृहात पाहू शकणार आहोत, तसेच जे जे उत्तम या साहित्य वाचनाच्या कार्यक्रमाचा ही आपण आनंद घेऊ शकणार आहोत. या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे वऱ्हाड निघालाय लंडन ला या सुप्रसिध्द नाटकाचा प्रयोग. मराठी शाळेच्या मुलांची सहल नुकतीच आयोजित करण्यात आली तसेच इतर सामाजिक संस्था संबंध दृढ होण्याची प्रक्रिया उत्तम पद्धतीने चालू आहे त्या साठी आपल्याला राष्ट्रपती यांचे हस्ते गौरविण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा मंडळासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो. कार्यक्रम तिकिट, जाहिराती आणि ऐच्छिक देणग्या धरून जे उत्पन्न मंडळास मिळते त्यातून आपला बराच वार्षिक खर्च निघतो. प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी होणारा खर्च हा नक्कीच जास्त असणार आहे. मंडळाच्या सभासदांच्या उत्साहाला प्रोत्साहन देताना, आपली आर्थिक बाजू कमजोर पडणार नाही ह्याचा प्रयत्न आपली कार्यकारिणी करत आहेच, परंतु ही बाजू बळकट ठेवण्यास आपल्या सर्वांचा सहयोग हवा आहे.

गणेशोत्सवात ऐच्छिक देणगी देऊन आपण हातभार लावू शकता. Online देणगी भरण्यासाठी या लिंक वर click करा. तसेच मंडळाच्या "Facebook" आणि “Youtube” channels ना subscribe करायला विसरू नका.

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी २०२२ – २३

Important Links:
म.म.सि. गणपती दर्शन (MMS Ganapati Darshan) 2022 
वऱ्हाड निघालंय लंडनला
विविध गुण दर्शन - लोकजागर, गणेशोत्सव २०२२

गणेशोत्सव 2022 - कार्यक्रम पत्रिका



Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software