महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि CricKingdom घेऊन येत आहेत
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024
महाराष्ट्र दिन विशेष - बॉक्स क्रिकेट!!
Tournament Format
Registration Charges
Team Registration: Team names of the historical forts in Maharashtra (as per the list below) shall be assigned to individual teams by the organizers.
Venue Address: Venue: CricKingdom Cricket Academy by Rohit Sharma (East Coast) St. Patrick School, 490 East Coast Road, Singapore 429058CricKingdom Cricket Academy Please contact following MMS Committee members for any additional information that you may need:
Venue Address:
Venue: CricKingdom Cricket Academy by Rohit Sharma (East Coast)
St. Patrick School, 490 East Coast Road, Singapore 429058
Please contact following MMS Committee members for any additional information that you may need:
Players who are unable to find a team, kindly write to feedback@mmsingapore.org so that we can help to connect you with like minded registered wait listed members. Registration RuleTournament Format and Match Rules Risk Warning & Disclaimer Note: Organizers reserve the right to cancel the event due to unforeseen circumstances or change the match rules, game format
Players who are unable to find a team, kindly write to feedback@mmsingapore.org so that we can help to connect you with like minded registered wait listed members.
Registration Rule
Note: Organizers reserve the right to cancel the event due to unforeseen circumstances or change the match rules, game format
नमस्कार मंडळी
1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र मंडळ सादर करत आहे - महाराष्ट्राची खाद्य संस्कृती (प्रदर्शन आणि विक्री).
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमिअर लीग सोबत हा खाद्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील खाली नमूद केलेल्या खाद्य पदार्थांचं प्रदर्शन करावं असा मंडळाचा मानस आहे.
1. खानदेशी पदार्थ
2. मराठवाडय़ातील पदार्थ
3. विदर्भातील पदार्थ
4. कोकणी पदार्थ
5. पश्चिम महाराष्ट्रातील पदार्थ
6. मुंबई चौपाटी / पुणे सारसबाग
7. शीतपेये
तर या वर्षीच्या "महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती" या कार्यक्रमात आपण सहभागी व्हायचं आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती खालील प्रमाणे:
1. वरील नमूद केलेल्या खाद्द्य पदार्थांचे स्टॉल आपण लावू शकता. वयोमर्यादा नाही पण नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख - 21 एप्रिल 2024
2. नावनोंदणी करताना ज्या पदार्थांचा स्टॉल उपलब्ध असेल फक्त त्या स्टॉल साठी तुम्ही नावनोंदणी करू शकता. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या पदार्थांची पुनरावृत्ती होऊ नये या हेतूने हा नियम ठेवला आहे. आम्ही दिलेल्या यादी व्यतिरिक्त इतर खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी आम्हाला संपर्क करावा.
3. स्टॉल लावण्यासाठी मंडळाचे विद्यमान सभासदत्व असणे आवश्यक आहे.
4. स्टॉल नोंदणी करण्यासाठी तात्पुरती ठेव रक्कम (Security Deposit) - $50
5. इतर काहीही प्रश्न असल्यास खालील समन्वयकांना WhatsApp द्वारे संपर्क साधावा
शितल धारूरकर: +65 8189 7501
मानसी मराठे : +65 8208 4985
अजय पिंपळशेंडे : +65 83655820
किंवा feedback@mmsingapore.org ला ई-मेल पाठवावी.
कार्यक्रमाचा इतर तपशील खालील प्रमाणे:
दिनांकः बुधवार, 01 मे 2024 (सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे)
वेळ: स. 11.00 ते दु. 4.00
स्थळः St. Patrick School, 490 East Coast Road, Singapore 429058
कार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक
● स. 10:00 ते स. 11:00 - स्टॉल्सची नोंदणी व मांडणी
● स. 11:00 ते दु. 12:00 - भारतीय उच्चायुक्त डॉ. शिल्पक अंबुले यांच्या हस्ते शुभारंभ
● स. 11:00 ते दु. 4:00 - खाद्यपदार्थांची विक्री
महत्वाची सूचना - तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमानंतर सात दिवसांच्या आत परत केली जाईल. जर नावनोंदणी करून काही कारणांमुळे आपणास स्टॉल लावणे शक्य झाले नाही, किंवा नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावण्यात आला, अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम-स्थळी अस्वच्छता वा नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत केली जाणार नाही.
काही महत्वाचे नियम
1. कार्यक्रमस्थळी स्वयंपाकाची परवानगी नसल्याने आपण ठरविलेले सगळे पदार्थ घरूनच बनवून आणावे. Electrical points/outlets strictly cannot be used. Please bring your own hot-cases, ice packs etc.
2. स्टॉल 3 फूट बाय 2 फूट टेबलावर मावेल असा असावा.
3. स्टॉल, सुरक्षितता व स्वच्छता यांचा विचार करुन लावलेला असावा.
4. स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाची जबाबदारी संपूर्णपणे स्टॉल लावणा-या व्यक्तीची राहील, मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
5. तुम्ही विकणाऱ्या पदार्थांचा विक्री दर अवास्तव नसावा हि विनंती गरज वाटल्यास समन्वयकांशी चर्चा करावी.
6. स्टॉल साठी प्रत्येकी 1 टेबल, 2 खुर्च्या मंडळातर्फे पुरविण्यात येतील, याव्यतिरिक्त लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था (उदा. टेबल-क्लॉथ, डिस्पोजेबल्स डबे, चमचे, सुट्टे पैसे) स्टॉलधारकांनी स्वतः करावी.
आपली स्नेहांकित,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Click here to get tickets for संकर्षण VIA स्पृहा
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्यासाठी घेऊन येत आहे
स्मृतिगंध निर्मित, गौरी थिएटर्स प्रस्तुत, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित संकर्षण VIA स्पृहा वयाची अट नसलेला, आबालवृद्धांना आपल्या निखळ मनोरंजनातून प्रफुल्लित करणारा अनुभव म्हणजे संकर्षण Via स्पृहा!
हृदयावर कोरले जाणारे, आपलेच वाटणारे सुमधुर काव्य म्हणजे संकर्षण Via स्पृहा!
संवादातील सहजता, अलगद भावना आणि आपुलकी म्हणजे संकर्षण Via स्पृहा!
निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग ! कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः वेळः शुक्रवार, 24 मे 2024, संध्याकाळी 6:30 वाजता स्थळः School of the Arts Singapore (SOTA) Concert Hall, 1 Zubir Said Dr, Singapore 227968
Click above button to buy tickets
तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः
Ticket Type- Members / Non-member Circle (Restricted View) - SGD 20.00 / 30.00 Circle - SGD 30.00 / 40.00 Stall Silver - SGD 40.00 / 60.00 Stall Gold - SGD 60.00 / 80.00 Stall Platinum - SGD 80.00 / 100.00 धन्यवाद! महाराष्ट्र मंडळ सिंगापूर NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.
** IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन * महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699